Menu
Category All Category
Saffron Swords (Marathi)
by   Manoshi Sinha Rawal (Author),   Yogaditiya Singh Rawal (Author)  
by   Manoshi Sinha Rawal (Author),   Yogaditiya Singh Rawal (Author)   (show less)
Saffron Swords (Marathi)
Product Description

-:पुस्तक परिचय:-

मुखबंध

आपल्या भारत देशात, भूतकालात होऊन गेलेल्या अगणित वीरांच्या आणि वीरांगनांच्या साहसाच्या, शौर्याच्या, संघर्षाच्या, प्रतिकाराच्या बाबतीत, कां ? कुणांस ठाऊक ? पण भारतीय इतिहास आणि शालेय अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके मौन बाळगतात ? एवढा संकोच त्यांना कां वाटतो ? कां ते कचरतात ? हे अगम्यच आहे . अत्यंत मोजक्याच योद्ध्यांना त्यात स्थान मिळालेले आहे किंवा त्यांचा उल्लेख त्यात आहे. आणखी एक दुर्दैव म्हणजे आमच्या इतिहासाच्या पाठयपुस्तकांत, शालेय अभ्यासक्रमात आपल्या ह्या योद्ध्यांच्या मानाने परकीय आक्रमकांनाच अधिक स्थान मिळालेले दिसते. परिणामी विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम बालमनावर अत्यन्त प्रतिकूल परिणाम होतो. एक हीन भावना त्यांच्या मनात जन्म घेते आणि विदेशी आक्रमकांची संस्कृती, ज्ञान, धारणा, संस्कार, क्षमता ही आपल्या सभ्यतेपेक्षा उजवी आहे असे त्यांना सतत वाटत राहते. परिणामी आपल्या सभ्यतेपासून आणि पारंपारिक ज्ञानापासून त्याचे मन दुरावते, त्यांच्या मनात एक न्यूनगंड निर्माण होतो आणि म्हणूनच विशेष करून आपल्या इतिहासाचे सूक्ष्म संशोधन करून, शुद्ध करून पुनर्लेखन करणे आवश्यक वाटते.

सॅफ्रॉन स्वोर्ड्स या ग्रंथात तीच उणीव काही अंशी दूर करण्याचा लेखिकेचा प्रयत्न आहे. भारताला गत तेराशे वर्षांची अविरत समृद्ध, संपन्न श्रीमंत, संघर्षपूर्ण अशी परंपरा लाभलेली आहे. अश्या अनेक वीरांच्या वीरांगनांच्या सत्यकथा भूतकाळात घडून गेलेल्या आहेत. दुदैवाने इतिहासाच्या पानांवर, अभ्यासक्रमात अग्रक्रम दिलेला दिसत नाही किंवा त्यांना त्यांचे यथोचित स्थान मिळालेले नाही.

प्रस्तुत ग्रंथाचे सहलेखक आणि हिंदी आवृत्तीचे अनुवादक योगादित्य सिंग रावल यांच्या मतांनुसार, भारताचा इतिहास आणि विशेषत: भारतीय सैन्याचा इतिहास शालेय जीवनात माझा आवडीचा विषय होता, परंतु ही पुस्तके वाचल्यानंतर सतत वाटत राहते की आम्ही इतके दुर्बल होतो कां ? आमची सैन्यविषयक क्षमता, आमची शस्त्र विषयक सिद्धता, आपले जीवन विषयक तत्वज्ञान, आपली संस्कृती, आपली सभ्यता इतकी कमकुवत, आधारहीन होती कां ? की विस्तारवादी आक्रमणाला आपण प्रखर विरोध देखील करू शकलो नाही. या कुतूहलापोटी मी, विविध माध्यमांतून, विविध संदर्भ गोळा करून विचार करू लागलो. मला असे लक्षात आले की सर्वसामान्यपणे सांप्रत शालेय इतिहास विषयक पुस्तकांतील असत्य एकतर्फी प्रकरणांतील आक्रमणकर्त्यांच्या महिमामंडनाने एक हीन, न्यूनगंडाची भावना वाचकांच्या मनात घर करते. आक्रमणकर्त्यांच्या तुलनेत आमचे ज्ञान दुय्यम दर्जाचे आहे असे वाचकाला सतत वाटत राहते. परिणामतः पारंपारिक सभ्यता आणि अर्जित पारंपरिक ज्ञान यांच्यापासून वाचक दुरावतात आणि पाश्चिमात्य आक्रमणकर्त्यांचे वर्चस्व योग्य अन् स्वाभाविक वाटू लागते. या पुस्तकात सनातन भारतीयांच्या अद्भुत शौर्याच्या, साहसाच्या, त्यागाच्या आणि राष्ट्रभक्तीच्या ५२ सत्यकथा समाविष्ट केलेल्या आहेत. दुर्दैवाने यातील अगणिक वीर आणि वीरांगना तर अश्या आहेत की ज्या पूर्णतः विस्मरणात गेलेल्या आहेत, किंवा त्यांचे विषयी नगण्य अशी माहितीच उपलब्ध आहे. मी खात्रीने सांगू शकतो की अधिकांश वाचकांना तर यांची अनेक नावे देखील माहितच नसणार. जसे कल्याण सिंग, मटमूर जामोह, साल्था ख्वांगचेरा, कपाया नायक, अल्लूरी सीतारामा राजू, काणेगंटी हनुमंतू, नरसिंग देव, सम्राट नागभट्ट, रोईपुल्लियानी, सुहेलदेव, राणा हमीर सिंग, राणी वेळू नचियार, कुंवर चैन सिंग, अवंती चेन्नई गभारू, सुहंगमुंग, कान्होजी आंग्रे, नायकी देवी इत्यादी. या सर्व योद्ध्यांनी इस्लामी आणि इंग्रजी आक्रमणकर्त्यांच्या विरुद्ध शौर्याने जबरदस्त प्रतिरोध केला. असे हे वीर आणि ह्या वीरांगना भारताच्या विविध कानाकोपऱ्यातून सर्व जाती धर्मातून आलेल्या आहेत. यातील अनेक नावे इतिहासाच्या पुस्तकात शोधूनही सापडत नाही म्हणून जेंव्हा सर्वसामान्य भारतीय जनमानस त्यांच्या संघर्षा विषयी पूर्णतः अनभिज्ञ आहे. आपला देश आणि आपले देशवासी आपल्या देशा चा प्राचीन, तर्कशुद्ध, तार्किक आणि समृद्ध इतिहास वाचून समजू लागतात तेंव्हा त्यांना राष्ट्राच्या ऐतिहासिक ज्ञात अज्ञात नायकांच्या प्रेरक वीरगाथा, प्रभावित करणे हे स्वाभाविक आहे. हीच प्रक्रिया पुढे जाऊन प्रखर राष्ट्रवादाला जन्म देणारी आहे.

वाराणशी स्थित माझे एक स्नेही, बंधुवत श्री तमल सन्याल म्हणतात, "जे राष्ट्र आपला इतिहास जाणून, घेवू शकत नाही, समजावून घेऊ शकत नाही, ते राष्ट्र कदापि इतिहास घडवू शकत नाही.” हा ग्रंथ आपला इतिहास जाणून घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. प्रत्येक भारतीयाला आत्मविश्वास वाटेल, अभिमानच वाटावा असेच कार्य हा ग्रंथ करेल हे निश्चित. प्रस्तुत ग्रंथ भारतवर्षाच्या अगणित, अज्ञात वीरांच्या वीरांगनांच्या शौर्यकथा आपणांसमक्ष मांडण्याचा एक विनम्र प्रयत्न आहे. प्रत्येक वाचकाला ह्या अज्ञात वीरांचे शौर्य, साहस, देशभक्तीबद्दल वाचून अभिमान वाटेल.

तर वाचकहो आपण सगळे मिळून आपल्या पूर्वजांच्या शौर्याची, साहसाची, त्यागाची आणि बलिदानाची परंपरा वाचून, अनुभवून गौरवान्वित होऊ या.

मानोषी सिन्हा रावल

अनुवादक मिलिंद रथकंठीवार

मिलिंद रथकंठीवार हे विज्ञानचे स्नातक असून नुकतेच बँकेतून निवृत्त झाले असून, मराठीतील एक प्रतिभासंपन्न, प्रथितयश लेखक, चित्रकार, अभिवाचक आहेत. व्यक्ती एक ! अभिव्यक्ती अनेक !! या शीर्षकाच्या कार्यक्रमाद्वारे ते विविध कलांची अभिव्यक्ती सादर करतात. भूतान येथे संपन्न होणाऱ्या सावरकर साहित्य संमेलनाचे ते प्रस्तावित अध्यक्ष देखील आहेत.

त्यांच्या मते , UNTILL THE LION LEARNS HOW TO WRITE EVERY STORY WILL GLORIFY THE HUNTER . जोवर सिंह स्वतः इतिहास लिहिणे शिकत नाही, तोवर प्रत्येक कहाणी शिकाऱ्याचेच गौरवगान करत राहणार.

Product Details
ISBN 13 9798885752343
Book Language Marathi
Binding Paperback
Publishing Year 2025
Total Pages 292
Edition First
GAIN AQ5UMFP5Z3A
Publishers Garuda Prakashan  
Category Non-Fiction   Indian History   History  
Weight 280.00 g
Dimension 14.00 x 22.00 x 2.00

Add a Review

0.0
0 Reviews

Verify Verified by Garuda
verified-by-garuda Verified by Garuda
₹499.00
₹499.00
whatsapp